Auckland Council Libraries: Marathi new titles

New titles

Ngā Taitara hōu

Marathi

False
 

धर्मरेषा ओलांडताना

या पुस्तकात हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन , शीख, जैन, बौद्ध अशा आंतरधर्मीय विवाहितांच्या १५ मुलाखती आहेत. या मुलाखतीमधून आंतरधर्मीय विवाहितांचे सहज़ीवन समजून घेण्याची धडपड आहे. या जोडप्यांचे जरी प्रेमविवाह असले तरी व्यावहारिक पातळीवर परस्परांशी, कुटंबियांशी, सभोवतालाशी त्यांनी कशापद्धतीनं जुकळ्वूनघेतलं, त्यांच्या एकमेकांविषयीच्या, स्वतःच्या आणि परस्परांच्या धर्माविषयीच्या समजूती काय होत्या, त्या मोडल्या अगर त्यात नवी भर पड़ली, या तऱ्हेच्या सहजीवनात एकमेकांविषयीच्या जाणिवा किती समृद्ध वा आकुंचित होतात इत्यादी बाबी जाणून घेतल्या आहेत. आपल्या नात्याकडे निरपेक्ष आणि खुलेपणाने पाहू शकणाऱ्या या जोडप्यांकडून मिळणारं संचित अमूल्य आहे. माणूसपणाच्या जाणिवा अधोरेखित करणारं आहे..--https://www.bookganga.com/

Request
 

इंधरधनुष्य विजेते

सरश्री

तुलसीदास यांच्या लेखणीतून रामभक्तीची गंगा पाझरली, ज्यामध्ये चिंब भिजून घेऊन आजही लोक पावन होत आहेत. प्रस्तुत पुस्तकात एक अनाथ बालक रामबोला ते गोस्वामी तुलसीदास होण्याच्या संपूर्ण जीवनयात्रेचे चित्रण आहे. त्याचबरोबर तुलसीदास यांनी लिहिलेल्या भक्ती, ज्ञान, नीती, लोकव्यवहार यांसारख्या गुणांवर आधारित काही रचना व त्यात दडलेली समज यांचे वर्णन आहे. या पुस्तकात तुलसीदासांच्या अनुपम चरित्राबरोबर आपण खालील गोष्टीही जाणू शकाल- भक्तांनाही विकार कसे घेरून टाकतात? ...----https://akshardhara.com/

Request
 

12 पॉवर प्रिन्सिपल्स फॉर सक्सेस

प्रॉक्टर, बॉब

समर्पित अभ्यास, निरनिराळे प्रयोग, ट्रायल आणि एरर याद्वारे बॉब प्रॉक्टर यांनी आयुष्यात मोठं यश मिळवलं. या संपूर्ण कारकि्दीत त्यांना जे शिकायला मिळालं, त्याचं सार त्यांनी १२ प्रिन्सिपल्सच्या रूपाने या पुस्तकात मांडलं आहे. सुसंघटितपणा आणि नियोजनबद्धता यात ते इतके कुशल होते की इतर कोणीही त्यांची बरोबरी करू शकत नाही. ते सर्वोत्तम होते. आपल्या आयुष्यात असणाऱ्या मर्यादा या आपणच स्वतःभोवती आखून घेतलेल्या असतात.--https://www.bookganga.com/

Request
 

माय लाईफ इन फुल

नूयी, इंद्रा

Summary of the Book स्वभावातील स्पष्टवक्तेपणा आणि त्याला लाभलेली विनोदाची किनार याचा वापर करून इंद्रा नूयी यांनी फान छान पुस्तक लिहिले आहे. भारतातील त्यांच्या लहानपणापासून ते कार्पोरेट विश्वात यशस्वी होण्यासाठी निश्चयाने केलेले प्रयत्न आणि प्रसंगी संतुलन साधण्यासाठी केलेले मोठे बदल, निग्रहाने उचललेली पावलं... सर्वच कौतुकास्पद. नोकरी करणार्‍या सर्व महिलांनी आणि महिलांबरोबर काम करणार्‍या महिलांवर प्रेम करणार्‍या आणि त्यांना पाठिंबा देणार्‍या सर्व पुरुषांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. - हिलरी रॉडहॅम क्लिंटन ही एका निडर महिलेने सांगितलेली तिची चित्ताकर्षक आत्मकथा आहे. तिने लिंगभेदाचे सर्व अडथळे पार केले आणि 21 व्या शतकातील ‘बिझनेस लीडर' म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली. ...---https://www.bookganga.com/

Request
 

वैद्यकायन

गोडबोले, अच्युत

आपल्या चरक, सुश्रुत यांपासून हिप्पोक्रॅटस, गेलन, विल्यम हार्वे, पाऊल ब्रोका, लुई पाश्चर, स्टीफन हेल्स, अलेक्झांडर फ्लेमिंग, वॉटसन आणि क्रिक, डॉ. जॉन मर्फी या आणि अश्या अनेक वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि सर्जन्स यांनी वैद्यकाच्या इतिहासात अमुल्य योगदान दिल आहे. त्यांनी लावलेल्या शोधांचा आज प्रत्येक माणसाला उपयोग होतो. वैद्यकायन हे पुस्तक म्हणजे अवघ्या वैद्यकविश्वाचा इतिहास आहे; यात वैद्यकाची मूलतत्त्व आणि माणस यांचा इतिहास आहे.--https://akshardhara.com/

Request
 

कृष्णांची 200+ आश्चर्यचकित करणारी सत्यं

त्रिवेदी, दीप

ष्ण - सगळ्यात जास्त पूजले जाणारे कृष्ण - सगळ्यात जास्त लोकप्रिय कृष्ण - सगळ्यांच्या हृदयाची तार पण मुख्य प्रश्न असा आहे की... तुम्ही कृष्णांबाबत जाणता किती? तितकंच, जितकं तुम्ही टीऱ्हीवरील मालिकांमधून पाहिलं आहे! काय कृष्णाने खरोखरच स्यमंतक मणी चोरला होता? काय कृष्णाने द्वारकेत वेश्यांना वसवले होते? काय कृष्णाने खरोखरीच १६,१०८ विवाह केले होते? काय कृष्णाचा अधिकांश परिवार त्यांच्या डोळ्यांदेखत नामशेष झाला होता? हेच तर आहे ना की, कृष्णाबाबत तुम्ही तितकेच जाणता, जितके तुम्ही टीव्ही सीरियल्समधून पाहिले आहे! ...आणि त्या सगळ्यांनी मिळून कृष्णाच्या जीवनाला काहीच्या काही रूप दिले आहे! अशात मग कोणी हे कसे जाणावे की त्यांच्या या जीवनकहाणीतील खरे किती आणि भूलथापा किती? --https://www.amazon.ca/

Request
 

निसर्ग संवाद = Nisarg samwad

सावरकर, प्रफुल्ल उदयन

Experience about forests by an environmental education officer from Maharashtra, India.

Request
 

तीन संन्यासी

सरश्री

संन्यास म्हणजे सांसारिक सुख- सुविधांचा त्याग करून, हिमालयात जाऊन एकांतवासात राहणे, असे मानले जात होते. परंतु, या तीन संन्याशांनी संन्यासाची ही परिभाषाच बदलून टाकली. त्यांनी लोकांसमवेत राहून त्यांना उच्चतम मार्गदर्शन केले. नि:स्वार्थ जीवनाची दिशा दाखवली. या तीन संन्याशांनी आपल्या जीवनाच्या कालखंडात लोकांना अमूल्य अशी शिकवण दिली. जनमानसांत खोलवर रूजलेल्या धारणांपासून लोकांना मुक्त करून जीवनाचे खरे उद्दिष्ट प्राप्त करण्याची प्रेरणा दिली. संन्यास घेण्यासाठी लोकजीवनाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही; तर इथे राहूनच स्म्न्यस्त जीवन जगता येते, हा महत्त्वपूर्ण बोध या पुस्तकाद्वारे प्राप्त होतो. आध्यात्मिक मार्गावरून चालणार्‍या प्रत्येक सत्यसाधकासाठी हे पुस्तक एक प्रेरणास्त्रोत आहे....---https://akshardhara.com/

Request
 

सक्सेस थ्रू अ पॉझिटिव्ह मेंटल ऍटिट्यूड

हिल, नेपोलियन

On success through a positive mental attitude.

Request
 

गुरू विवेकी भला

जोशी, अंजली

गुरु आणि शिष्याचे नाते हे कोणत्याही संस्कृतीतले एक मनोरम्य नाते आहे. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राद्वारे भारतीय मानसशास्त्रात अमूल्य योगदान दिलेले कि. मो. फडके यांच्याबरोबरच्या गुरु शिष्य नात्याचा हृदय प्रवास अंजली जोशी यांनी गुरु विवेकी भला या पुस्तकात रेखाटला आहे, जो मराठीमध्ये अत्यंत अभिनव आहे. गुरूला समजून घेण्याचा स्वतःला समजून घेण्याचा व त्याचबरोबर गुरु शिष्य नात्यालाही समजून घेण्याचा हा प्रवास आहे. या प्रवासात गुरु विद्यादान कसे करतो हे तर समजतेच, पण त्या जोडीने गुरूच्या मानसिक विश्वाचा मानसशास्त्रीय नजरेतून कसा वेध घेतला जाऊ शकतो, यावरही प्रकाश पडतो.--https://akshardhara.com/

Request
 

वाचनवाटा

चव्हाण, आदिनाथ

सकाळ-अ‍ॅग्रोवन मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मला भावलेलं पुस्तक' या स्तंभलेखनाचं हे संग्राह्य पुस्तक. ‘बुक्स ऑन बुक्स' प्रकारातील प्रस्तुत पुस्तकातून आदिनाथ चव्हाण वाचकांना जागतिक साहित्य विश्वातील एकेक अनमोल नक्षत्र निरखून पाहण्याची रीत दाखवतात. स्थलातीत, कालातीत असणाऱ्या श्रेष्ठ साहित्यकृतींमध्ये काय भावलं याची एका साक्षेपी संपादकाने घेतलेली नोंद काय वाचावं? वाचलेलं स्वतःत कसं रुजवावं? वाचनातून अधिक शहाणं कसं व्हावं? या विषयीच्या दिशा दाखवणारं पुस्तक माणूस, माणसाचं जगणं, निसर्ग, प्रेम, युद्ध संहार यातून तरलेली मानवता, राजकारण, मानसशास्त्र, जगण्याचं तत्त्वज्ञान अशा सगळ्या विषयांतील पुस्तकांची निवड.---https://bookstation.in/

Request
 

पडद्यामागची गोष्ट

नाइक, सुनील

On the basic techniques of film making.

Request
 

विद्येच्या प्रांगणात

साळुंखे, माणिकराव

एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. त्याबरोबर या बदलामुळे सामाजिक जीवनाला मात्र तडे गेले आहेत. या नव्या आव्हांनांनी जागतिक व्यवस्थेचा ढाचा बदलला आहे. या बदलाच्या पार्श्वभूमीवर डॉ. माणिकराव साळुंखे यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून शिक्षणव्यवस्थेचे वेगळे जग प्रस्तुत केले आहे. डॉ. साळुंखे यांनी पाच विद्यापीठांचे कुलगुरू पद भूषविले आहे. राज्याचे, केंद्राचे व स्वायत्त विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शिवाजी विद्यापीठात व राजस्थान केंद्रीय विद्यापीठात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यांनी विविध विद्यापीठांमध्ये केलेक्या प्रयोगाचे व उभारलेल्या नवीन प्रकल्पाचे वर्णन या आत्मचरित्रात आहे...---https://akshardhara.com/

Request
 

मुलांचे व्यक्तिमत्त्व साकारताना...

जोशी, सचिन उषा विलास

विद्यार्थ्यांना विसरभोळं कोण बनवतं मुलांना राग का येतो विद्यार्थ्यांना शिस्त का लागत नाही मुलं खोटं का बोलतात मुलं मोबाइल गेम्समध्ये का अडकतात मुलं हिंसक का होतात मुलांची भावनिक बुद्धिमत्ता कशी वाढवावी बालमेंदूची जडणघडण कशी होते शाळा निवडताना कुठलं बोर्ड घ्यावं सिंगल पेरेंटिंग कसं हाताळावं मुलांचा अटेंशन स्पॅन कसा वाढवावा मुलांना कशा आणि कुठल्या गोष्टी सांगाव्यात मुलांची भाषा आणि उच्चार कसे सुधारावेत स्क्रीन टाइम कसा कमी करावा मुलांची अभ्यासाची तयारी कशी करून घ्यावीपरीक्षेच्या वेळेस मुलांना कसं वातावरण द्यावं मुलांना स्टेजवर बोलायला कसं शिकवावं अनुभवसंपन्न पालकत्व कसं असावं या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील.---https://www.amazon.com.au/

Request
 

क्रेविंग

हिंगणे, विनायक

वजन वाढवणारी वा कमी करणारी औषधे विकत घेण्यापूर्वी आहाराच्या संदर्भातल्या काही बाळबोध प्रश्नांचा विचार व्हायलाच पाहिजे. आपण काय खावे, केव्हा खावे, किती खावे, या मूलभूत प्रश्नांबरोबरच भूक नसतानाही आपण का खातो, आपल्याला सारखे खावेसे का वाटते, जेवणात गोड पदार्थ हवाच हा आग्रह मी का धरतो, आपले खाण्यावर अतोनात प्रेम का, आपला आवडता पदार्थ खाण्याची संधी मिळाली की सुखवस्तू घरातली माणसेसुध्दा हावरटासारखे का खातात, हे सगळे प्रश्न आहाराबद्दल जागरूक असणार्‍या सुशिक्षित मंडळींना पडायला हवेत. अर्थात वरकरणी प्रश्न सोपे वाटत असले, तरी त्यांची समाधानकारक उत्तरे देणे सोपे नाही. हे कठीण काम डॉ. विनायक हिंगणे याम्नी आपल्या ओघवत्या शैलीत सगळ्यांना आकलन होईल, याची काळजी घेत सहज पार पाडले आहे. --https://akshardhara.com/

Request
 

भित्तुक

गिरासे, संजीव

Request
 

रेत समाधी

गीतांजलि श्री

Novel based on the transformative journey of 80-year-old Ma, who becomes depressed after the death of her husband. She then decides to travel to Pakistan, confronting trauma that had remained unresolved since she was a teenager who survived the partition...

Request
 

द वॉन्टेड

क्रेस, रॉबर्ट

Novel based on a single mother who concerned about her son and hires private investigator.

Request
 

नथिंग व्हेंचर्ड

आर्चर, जेफ्री

Novel based on William Warwick, a fictional detective.

Request
 

घोस्ट रायटर आणि इतर विज्ञानकथा = Ghost writer aani itar vidnyan katha

महाबळ, आशिष

विज्ञान संशोधनाची नवनवी क्षेत्रं विकसित होत असताना विज्ञानकथा लेखनानेही नव्या कल्पना धुंडाळाव्यात, अशी अस्सल विज्ञानप्रेमी वाचकांची अपेक्षा असते. या संग्रहातल्या कथा ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतात. विज्ञानकथावाचनाची आपली इयत्ता वाढवतात. माणूस नव्या तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक अधीन होत असताना क्षणभर थांबून त्याच्या योग्यायोग्यतेवर विचार करण्याची गरज अधोरेखित करणाऱ्या विज्ञानकथा. आशिष महाबळ हा प्रख्यात विज्ञान संशोधक आहे. त्याचं नाव जागतिक खगोलशास्त्र परिषदेने एका लघुग्रहाला दिलं आहे. लेखकाच्या साहित्यात कुठे ना कुठे त्याच्या आयुष्याचं प्रतिबिंब पडत असतं. आशिषच्या कथाही याला अपवाद नाहीत. त्याच्या कथा विज्ञानाच्या भक्कम पायावर रचलेल्या हार्ड कोअर सायन्स फिक्शन आहेत.--https://ksagaronline.com/

Request
 

सूर्याची सावली

थोरात, नितिन

बाप असतो जीर्ण म्हाताऱ्या वडासारखा. शांत, संयमी आणि स्थिरगंभीर पाऊस-वाऱ्याला आव्हान देत कड़ाडत्या विजेकड़े डोळे वटारुन बघणारा. बाप असतो सूर्याविरुद्ध युद्ध पुकारणारा, उन्हाचा तळतळीत लेप पाठीवर रापवित, लेकरावर मायेची गार सावली पांघरणारा. ---https://www.bookganga.com/

Request
 

मोगलाई

शेळके, विलास

या कादंबरीचे वेगळेपण असे की, येथे धरणांच्या उभारणीबरोबरच मानवी संबंधांचे, त्यांच्या व्यक्तिमत्वांचे अधिक चांगले चित्रण केले आहे. शिवाय यात समाजातील विविध स्तरांचे चित्रण आले आहे. समाजकारणापासून राजकारणापर्यंतची विविध क्षेत्रेही या कादंबरीतून प्रकट झाली आहेत. त्यामुळे ही कादंबरी जीवनचित्रणाच्या दृष्टीने अधिक समृध्द्द आहे. --https://akshardhara.com/

Request
 

दि रोझाबल लाइन

सांघी, अश्विन

Request
 

मुंबई ऍव्हेंजर्स = Mumbai avengers

झैदी, एस. हुसैन

Novel based on terrorism and suspense thriller.

Request
 

क्षितिज आणि किनारा

फाटक-काटकर, वैशाली

नय दीक्षित सरांकडून मॅनेजमेंटचे धडे घेत, स्ट्रॅटेजी कोळून पिऊन एमबीए टॉपर मनोरमाचा मल्टिनॅशनल कंपनीत शिरकाव होतो. परस्पर विरोधी असूनही एकमेकांना तोलत, पुरक असणार्‍या यिन आणि यॅन्ग ची संकल्पना तत्त्वनिष्ठ अनयसाठी आदर्श असते. तर नदीसारख दोन तटांमध्ये मनोरमाला आयुष्य आखून ठेवायच नसत. तिच्या आकांक्षांना क्षितिजापलीकडे झेप घ्यायची असते. स्वत:चा मार्ग आखण्याच गमक गवसल्याशिवाय कितीही डुबक्या मारल्या तरी गटांगळ्या खाव्या लागतील असे सल्लारूपी वास्तव, बॉस शेखर इनामदार मनोरमाला ऎकवतो. शेखरने दिलेल प्रत्येक आव्हान स्वीकारून, उंच आणि लांब पल्ल्याची उडी मारून, अडथळे पार करायची जिद्द मनोरमा ठेवते. दीक्षितांबरोबर संसार बहरताना, कॉर्पोरेट करियरचा समतोल राखताना अनेकदा तिची तोलकाठी डगमगते. ---https://akshardhara.com/

Request
 

पती आले हाती

शेगोकर, अशोक महादेव

Request
 

द एन्ड गेम

झैदी, एस. हुसैन

Request
 

संताजी घोरपडे

मोरे, रवि शिवाजी

Novel based on Santājī Ghorapaḍe, 1660-1696, Maratha general.

Request
 

अर्धनारी

मुरुगन, पेरुमाल

एक अनोखी कथा. दोन वेगळे शेवट. पेरुमल मुरुगन यांच्या वन पार्ट वुमन (माधुरोबागन) या कादंबरीच्या घवघवीत यशानंतर काली आणि पोन्ना यांच्यातल्या उत्कट प्रेमाच्या अशा चिंधड्या उडालेल्या पाहून वाचक मोठ्या विमनस्क स्थितीत जातात. या प्रेमी जोडप्याचं पुढे काय होणार? ट्रायल बाय सायलेन्स (मौन बचाव/अर्धनारी) ही कादंबरी म्हणजे मूळ कादंबरीच्या दोन कल्पक आनुषंगिक भागांपैकी एक होय. ‘वन पार्ट वुमन'च्या शेवटी कालीने पोन्नाला शिक्षा करायचा कठोर निश्चय केलेला असतो. तिने त्याचा पूर्ण विश्वासघात केल्याची त्याची खात्रीच पटलेली असते. परंतु, पोन्नाचा स्वत:चा दोष नसताना तिला जे प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं जातं, त्यापायी तीही अतिशय अस्वस्थ होते. --https://bookstation.in/

Request
 

डोंगराने गाव गिकला

चोरगे, तानाजीराव

Request
 

बारीक बारीक आवाज वाढत चाललेत

अवसरीकर, स्नेहा

बारीक बारीक आवाज वाढत चाललेत या स्नेहा अवसरीकर यांच्या पहिल्यावहिल्या कथासंग्रहात माणसामाणसांतल्या नात्यांचे विविध अविष्कार पाहायला मिळतात. कुठे काका-पुतण्यातल्या पारंपारिक नात्याच्या पलीकडे जाणारं, आपल्या पुतण्याबरोबरचं आत्मीय नातं जपणारे केशवकाका तर कुठे स्वतःच्या एकाकी आयुष्याचं प्रतिबिंब एका कबुतराच्या पिल्लात पाहून त्याच्याशी नातं जोडणाऱ्या वृंदाताई. कधी आपल्या दिवंगत सावत्र सासूचा केवळ फोटो पाहून तिच्याशी नातं जुळवलेली नंदी तर कधी स्वतःच्या अस्तित्वाचं भान आल्यावर स्वतःशीच नातं जोडणारी ‘मी'. नवऱ्याला आलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या मेल्स वाचून हादरून गेलेली एखादी सुभद्रा अखेर कुठलीच नाती संपूर्णपणे आपली ---https://bookstation.in/

Request
 

एकाकी सुगी

मुरुगन, पेरुमाल

Request
 

विठाईची कान्हाई

काळे, आरती

Novel based on Kānhopātrā, Hindu saint.

Request
 

मिरॅकल

विभुते, सुनील

कडव्या दहशतवाद्यांचा नायनाट घडवला रणरागिणी झालेल्या स्त्रियांनी ! त्यांच्या मदतीला होती विशिष्ट किरणं आणि विशिष्ट घुबडं ! सर्जिकल स्ट्राईक एक दुर्मीळ वनस्पती. तिच्या फळांचा रस पिऊन जन्माला आला एक राक्षस ! काय होती या राक्षसाची करणी ? राकेस करणी जिवंत माणसाची हत्या करून त्याच्या व्यक्तिमत्त्वासकट अन् स्वभाववैशिष्ट्यांसकट त्याचं रंगरूप साकारणारा परग्रहवासी यंत्रमानव. त्याच्या हल्ल्यापासून पृथ्वीवासीयांचा बचाव झाला का ? फॉलसोबो कर्णानं दान केली आपली कवचकुंडलं. आज आपलं हृदय कोणी दान करील का ? मानवी हृदयाप्रमाणे काम करणारं कृत्रिम हृदय बनवता येईल का ? कार्डीओ – ७७ दहशतवादाशी लढा देणारा कृत्रिम काजवा ! पोलीसयंत्रणेला अन् लष्कराला त्याची मदत झाली का ? --https://www.amazon.ca/

Request
 

झांबल

गायकवाड, समीर

भेटलेली माणसे घनदाट होती! थेट पोचायास कोठे वाट होती? कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ह्या काव्यपंक्ती आहेत. काळजाला हात घालण्याची ताकद या ओळींत आहे. याच तोलामोलाची माणसं या कथांत भेटतील. ही माणसं अनेकार्थांनी घनदाट होती. त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत होती, मानवी जीवन मूल्यांवरचा त्यांचा विश्वास अफाट होता, त्यांची नाती अतूट मायेची होती आणि मुख्य म्हणजे अंधाराच्या उंबर्‍यावरच्या प्रकाशखुणा त्यांच्या भाळी होत्या. ही माणसं आपल्या अवतीभवतीच असतात तरीही त्यांच्यातलं वेगळेपण आपल्याला उशिराने जाणवतं. याबद्दलच्या लटक्या स्पष्टीकरणासाठी आपण पळवाटा शोधत राहतो तोवर ते निघून गेलेले असतात.--https://akshardhara.com/

Request
 

दयन

पवार, युवराज मेघराज

Request
 

या वळणावर

शिंदे, उषा

आयुष्य.. प्रत्येकासाठी वेगळं, एवढंच नव्हे, तर एकाच आयुष्यात आपण किती वेगळे आणि विरुद्ध अनुभवही घेत असतो. कधीतरी वाटतं, सारंच अधुरं... पुन्हा सुरू होतो प्रवास पूर्णत्वाच्या दिशेनं! मात्र अशा अर्धवट राहण्यात आणि त्याचा शोध घेण्यातही एक वेगळीच असोशी असते, असं वाटतं. आयुष्याच्या 'या वळणावर' या कथासंग्रहात उषा शिंद यांनी घेतलेल्या अनेकविध कथांचा हा मागोवा....--https://www.bookganga.com/

Request
 

बालूच्या अवस्थांतराची डायरी = Baluchya awasthantarachi diary : short stories

गुरव, किरण

किरण गुरव यांची कथा ही केवळ ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी'नाही.हा आजच्या काळाच्या अवस्थांतराचाच कोलाज आहे.--https://akshardhara.com/

Request
 

अंतर्नाद

जोशी, रमेश

सकारात्मकतेचे महत्व अधोरेखित करणारा ..... मानवी मनाची नकारात्मकता दर्शवणारा आणि त्याचा उताराही सांगणारा असा हा कथा संग्रह आहे---https://akshardhara.com/

Request
 

Kāmāṭhīpurā

Sudhīra Jādhava

Request
 

Mahāśvetā

Sudhā Mūrti

Request
 

अलौकिक

दानवे, जयश्री जयशंकर

Brief biographies of Indian personalities from different fields.

Request
 

औषधी वनस्पती उपचार

पाठक, दत्तकुमार

On herbal medicine and therapeutic use of vegetables and fruits.

Request
 

मेलोडियस

दानवे, जयश्री जयशंकर

Articles on the life and works of music directors and singers of Hindi motion pictures.

Request
Auckland Council Libraries:New titles Check out the latest new titles in fiction, nonfiction, DVDs, CDs, eBooks, audiobooks, Māori, and community language books.