Auckland Council Libraries: Marathi new titles

New titles

Ngā Taitara hōu

Marathi

False
 

फूल आणि मधमाशी

दावर, अशोक

Picture book

Children's story based on two bees who love each other.

Request
 

गब्दुल

गुप्ता, प्रचेत

Picture book

Story is about a naughty cloud named Tultule who discovers a black spot on her body and wants to wash it away to become beautiful, but the river is dry, then how Tultule with wash her spot.

Request
 

एकशे सदतिसावा पाय

माधुरी पुरंदरे

Picture book

गोमेला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक पाय मोडला. पण कितवा पाय मोडला हेच कळेना. मग तिला कोण आणि कशी मदत करणार..?...https://akshardhara.com.

Request
 

मामाच्या मळयात

बेंडभर, सचिन

Picture book

Request
 

मज्जाच मज्जा

वैष्णव, सुभाषचंद्र

Picture book

Request
 

ठुस्स भुताटकी!

तांबे, राजीव

Picture book

Request
 

श्लोककथा = Shlokkatha : nonfiction

जोशी, कांचन प्रशांत

Collection on real incidents on ehics; for juvenile.

Request
 

पंडित भीमसेन जोशी = Bhimsen Joshi

सिह, शिवेंद्र कुमार

On brief biography of Bhimsen Joshi, 1922-2011, Indian vocalist in Hindustani tradition.

Request
 

चंद्र, चंद्र आणि चंद्रच = Chandra, chandra aani chandrach

बर्वे, दिलीप

चंद्रजन्मापासून ते आजपर्यंत पहिल्या रशियन स्पुटनिक पासून अपोलो १७ पर्यंत. भारताच्या आणि इतर देशांच्या भविष्यातील चांद्रमोहिमा. एकंदरच चंद्राबद्दल सर्वकष माहिती देणारे पुस्तक.---https://akshardhara.com.

Request
 

घरोघरी खेळा खेळ.

तांबे, राजीव

Play house games for children.

Request
 

किमयागार कार्व्हर

गवाणकर, वीणा

On the life of George Washington Carver, 1864-1943, an African American agriculturist; for juvenile.

Request
 

बिरबलाचं 'विज्ञान'.

फोंडके, बाळ

Children's stories based on scientific theme.

Request
 

खरा गुरु कोण? वैतरगोष्टी

नाईक, ज्ञानदा

गोष्ट डॉट कॉम किशोरांसाठी' या पुस्तकात किशोरवयीन मुलांसाठी आवश्यक असणारी मूल्ये आणि संस्कार यांच्याशी संबंधित बोधकथा ज्ञानदा नाईक यांनी लिहिल्या आहेत. आजच्या काळात किशोरवयातील मुलांना मोबाईल, टी.व्ही., इंटरनेट, व्हिडिओ गेम्स अशा अनेक भुरळ पाडणार्‍या गोष्टी उपलब्ध आहेत. यांच्या पसार्‍यात हरवलेली मुले जगण्यासाठी आवश्यक अशी मूल्ये आणि संस्कार हरवून बसतात. जगण्यातला आनंद गमावून बसतात. फार लहानही नाही आणि मोठेही नाही अशा अडनीड वय असणार्‍या या मुलांना दिशा देण्याचे काम या बोधकथा करतात. कुठलाही उपदेश नाही, तर ‘कसे जगावे' हे या बोधकथांमधून ज्ञानदा नाईक सांगतात. प्राणी, पक्षी, फुले, पाने यांना त्यांनी आपल्या कथांमध्ये बोलते केले आहे. प्रामाणिकपणा, धैर्य, धाडस, चातुर्य...--https://bookstation.in.

Request
 

छोटीशी पाऊलवाट वैतरगोष्टी

नाईक, ज्ञानदा

‘गोष्ट डॉट कॉम किशोरांसाठी' या पुस्तकात किशोरवयीन मुलांसाठी आवश्यक असणारी मूल्ये आणि संस्कार यांच्याशी संबंधित बोधकथा ज्ञानदा नाईक यांनी लिहिल्या आहेत. आजच्या काळात किशोरवयातील मुलांना मोबाईल, टी.व्ही., इंटरनेट, व्हिडिओ गेम्स अशा अनेक भुरळ पाडणार्‍या गोष्टी उपलब्ध आहेत. यांच्या पसार्‍यात हरवलेली मुले जगण्यासाठी आवश्यक अशी मूल्ये आणि संस्कार हरवून बसतात. जगण्यातला आनंद गमावून बसतात. फार लहानही नाही आणि मोठेही नाही अशा अडनीड वय असणार्‍या या मुलांना दिशा देण्याचे काम या बोधकथा करतात. कुठलाही उपदेश नाही, तर ‘कसे जगावे' हे या बोधकथांमधून ज्ञानदा नाईक सांगतात. प्राणी, पक्षी, फुले, पाने यांना त्यांनी आपल्या कथांमध्ये बोलते केले आहे. प्रामाणिकपणा, धैर्य, धाडस, चातुर्य, कल्पकता.https://bookstation.in.

Request
 

बाय रॉयल अपॉइन्टमेन्ट

आर्चर, जेफ्री

"जागतिक कीर्तीचे लोकप्रिय लेखक जेफ्री आर्चर हे आपल्या छोट्या वाचकांसाठी ही एक आगळीवेगळी रोमहर्षक कहाणी घेऊन आले आहेत. यात तीन गमतीदार गोष्टींचा समावेश आहे.. प्रिया कुरियन आणि अनुपमा अजिंक्य आपटे यांनी आपल्या मजेदार देखण्या चित्रांनी या पुस्तकाची सजावट केलेली आहे. राजा-राणीची रंगतदार गोष्ट, किलर किपरची जम्माडी जम्मत आणि अद्भुत चौकोनी जगाची ही सफर आपल्या बालवाचकांना मनमुराद आनंद देईल."..https://bookstation.in.

Request
 

राफिणू

ढोले, संजय

Request
 

बिरबलाचं 'विज्ञान'.

फोंडके, बाळ

Children's stories based on scientific theme.

Request
 

सक्सेस थ्रू अ पॉझिटिव्ह मेंटल ऍटिट्यूड

हिल, नेपोलियन

On success through a positive mental attitude.

Request
 

क्रेविंग

हिंगणे, विनायक

वजन वाढवणारी वा कमी करणारी औषधे विकत घेण्यापूर्वी आहाराच्या संदर्भातल्या काही बाळबोध प्रश्नांचा विचार व्हायलाच पाहिजे. आपण काय खावे, केव्हा खावे, किती खावे, या मूलभूत प्रश्नांबरोबरच भूक नसतानाही आपण का खातो, आपल्याला सारखे खावेसे का वाटते, जेवणात गोड पदार्थ हवाच हा आग्रह मी का धरतो, आपले खाण्यावर अतोनात प्रेम का, आपला आवडता पदार्थ खाण्याची संधी मिळाली की सुखवस्तू घरातली माणसेसुध्दा हावरटासारखे का खातात, हे सगळे प्रश्न आहाराबद्दल जागरूक असणार्‍या सुशिक्षित मंडळींना पडायला हवेत. अर्थात वरकरणी प्रश्न सोपे वाटत असले, तरी त्यांची समाधानकारक उत्तरे देणे सोपे नाही. हे कठीण काम डॉ. विनायक हिंगणे याम्नी आपल्या ओघवत्या शैलीत सगळ्यांना आकलन होईल, याची काळजी घेत सहज पार पाडले आहे. --https://akshardhara.com/

Request
 

भित्तुक

गिरासे, संजीव

Request
 

रेत समाधी

गीतांजलि श्री

Novel based on the transformative journey of 80-year-old Ma, who becomes depressed after the death of her husband. She then decides to travel to Pakistan, confronting trauma that had remained unresolved since she was a teenager who survived the partition...

Request
 

द वॉन्टेड

क्रेस, रॉबर्ट

Novel based on a single mother who concerned about her son and hires private investigator.

Request
 

नथिंग व्हेंचर्ड

आर्चर, जेफ्री

Novel based on William Warwick, a fictional detective.

Request
 

घोस्ट रायटर आणि इतर विज्ञानकथा = Ghost writer aani itar vidnyan katha

महाबळ, आशिष

विज्ञान संशोधनाची नवनवी क्षेत्रं विकसित होत असताना विज्ञानकथा लेखनानेही नव्या कल्पना धुंडाळाव्यात, अशी अस्सल विज्ञानप्रेमी वाचकांची अपेक्षा असते. या संग्रहातल्या कथा ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतात. विज्ञानकथावाचनाची आपली इयत्ता वाढवतात. माणूस नव्या तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक अधीन होत असताना क्षणभर थांबून त्याच्या योग्यायोग्यतेवर विचार करण्याची गरज अधोरेखित करणाऱ्या विज्ञानकथा. आशिष महाबळ हा प्रख्यात विज्ञान संशोधक आहे. त्याचं नाव जागतिक खगोलशास्त्र परिषदेने एका लघुग्रहाला दिलं आहे. लेखकाच्या साहित्यात कुठे ना कुठे त्याच्या आयुष्याचं प्रतिबिंब पडत असतं. आशिषच्या कथाही याला अपवाद नाहीत. त्याच्या कथा विज्ञानाच्या भक्कम पायावर रचलेल्या हार्ड कोअर सायन्स फिक्शन आहेत.--https://ksagaronline.com/

Request
 

सूर्याची सावली

थोरात, नितिन

बाप असतो जीर्ण म्हाताऱ्या वडासारखा. शांत, संयमी आणि स्थिरगंभीर पाऊस-वाऱ्याला आव्हान देत कड़ाडत्या विजेकड़े डोळे वटारुन बघणारा. बाप असतो सूर्याविरुद्ध युद्ध पुकारणारा, उन्हाचा तळतळीत लेप पाठीवर रापवित, लेकरावर मायेची गार सावली पांघरणारा. ---https://www.bookganga.com/

Request
 

मोगलाई

शेळके, विलास

या कादंबरीचे वेगळेपण असे की, येथे धरणांच्या उभारणीबरोबरच मानवी संबंधांचे, त्यांच्या व्यक्तिमत्वांचे अधिक चांगले चित्रण केले आहे. शिवाय यात समाजातील विविध स्तरांचे चित्रण आले आहे. समाजकारणापासून राजकारणापर्यंतची विविध क्षेत्रेही या कादंबरीतून प्रकट झाली आहेत. त्यामुळे ही कादंबरी जीवनचित्रणाच्या दृष्टीने अधिक समृध्द्द आहे. --https://akshardhara.com/

Request
 

दि रोझाबल लाइन

सांघी, अश्विन

Request
 

मुंबई ऍव्हेंजर्स = Mumbai avengers

झैदी, एस. हुसैन

Novel based on terrorism and suspense thriller.

Request
 

क्षितिज आणि किनारा

फाटक-काटकर, वैशाली

नय दीक्षित सरांकडून मॅनेजमेंटचे धडे घेत, स्ट्रॅटेजी कोळून पिऊन एमबीए टॉपर मनोरमाचा मल्टिनॅशनल कंपनीत शिरकाव होतो. परस्पर विरोधी असूनही एकमेकांना तोलत, पुरक असणार्‍या यिन आणि यॅन्ग ची संकल्पना तत्त्वनिष्ठ अनयसाठी आदर्श असते. तर नदीसारख दोन तटांमध्ये मनोरमाला आयुष्य आखून ठेवायच नसत. तिच्या आकांक्षांना क्षितिजापलीकडे झेप घ्यायची असते. स्वत:चा मार्ग आखण्याच गमक गवसल्याशिवाय कितीही डुबक्या मारल्या तरी गटांगळ्या खाव्या लागतील असे सल्लारूपी वास्तव, बॉस शेखर इनामदार मनोरमाला ऎकवतो. शेखरने दिलेल प्रत्येक आव्हान स्वीकारून, उंच आणि लांब पल्ल्याची उडी मारून, अडथळे पार करायची जिद्द मनोरमा ठेवते. दीक्षितांबरोबर संसार बहरताना, कॉर्पोरेट करियरचा समतोल राखताना अनेकदा तिची तोलकाठी डगमगते. ---https://akshardhara.com/

Request
 

पती आले हाती

शेगोकर, अशोक महादेव

Request
 

द एन्ड गेम

झैदी, एस. हुसैन

Request
 

संताजी घोरपडे

मोरे, रवि शिवाजी

Novel based on Santājī Ghorapaḍe, 1660-1696, Maratha general.

Request
 

अर्धनारी

मुरुगन, पेरुमाल

एक अनोखी कथा. दोन वेगळे शेवट. पेरुमल मुरुगन यांच्या वन पार्ट वुमन (माधुरोबागन) या कादंबरीच्या घवघवीत यशानंतर काली आणि पोन्ना यांच्यातल्या उत्कट प्रेमाच्या अशा चिंधड्या उडालेल्या पाहून वाचक मोठ्या विमनस्क स्थितीत जातात. या प्रेमी जोडप्याचं पुढे काय होणार? ट्रायल बाय सायलेन्स (मौन बचाव/अर्धनारी) ही कादंबरी म्हणजे मूळ कादंबरीच्या दोन कल्पक आनुषंगिक भागांपैकी एक होय. ‘वन पार्ट वुमन'च्या शेवटी कालीने पोन्नाला शिक्षा करायचा कठोर निश्चय केलेला असतो. तिने त्याचा पूर्ण विश्वासघात केल्याची त्याची खात्रीच पटलेली असते. परंतु, पोन्नाचा स्वत:चा दोष नसताना तिला जे प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं जातं, त्यापायी तीही अतिशय अस्वस्थ होते. --https://bookstation.in/

Request
 

डोंगराने गाव गिकला

चोरगे, तानाजीराव

Request
 

बारीक बारीक आवाज वाढत चाललेत

अवसरीकर, स्नेहा

बारीक बारीक आवाज वाढत चाललेत या स्नेहा अवसरीकर यांच्या पहिल्यावहिल्या कथासंग्रहात माणसामाणसांतल्या नात्यांचे विविध अविष्कार पाहायला मिळतात. कुठे काका-पुतण्यातल्या पारंपारिक नात्याच्या पलीकडे जाणारं, आपल्या पुतण्याबरोबरचं आत्मीय नातं जपणारे केशवकाका तर कुठे स्वतःच्या एकाकी आयुष्याचं प्रतिबिंब एका कबुतराच्या पिल्लात पाहून त्याच्याशी नातं जोडणाऱ्या वृंदाताई. कधी आपल्या दिवंगत सावत्र सासूचा केवळ फोटो पाहून तिच्याशी नातं जुळवलेली नंदी तर कधी स्वतःच्या अस्तित्वाचं भान आल्यावर स्वतःशीच नातं जोडणारी ‘मी'. नवऱ्याला आलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या मेल्स वाचून हादरून गेलेली एखादी सुभद्रा अखेर कुठलीच नाती संपूर्णपणे आपली ---https://bookstation.in/

Request
 

एकाकी सुगी

मुरुगन, पेरुमाल

Request
 

विठाईची कान्हाई

काळे, आरती

Novel based on Kānhopātrā, Hindu saint.

Request
 

मिरॅकल

विभुते, सुनील

कडव्या दहशतवाद्यांचा नायनाट घडवला रणरागिणी झालेल्या स्त्रियांनी ! त्यांच्या मदतीला होती विशिष्ट किरणं आणि विशिष्ट घुबडं ! सर्जिकल स्ट्राईक एक दुर्मीळ वनस्पती. तिच्या फळांचा रस पिऊन जन्माला आला एक राक्षस ! काय होती या राक्षसाची करणी ? राकेस करणी जिवंत माणसाची हत्या करून त्याच्या व्यक्तिमत्त्वासकट अन् स्वभाववैशिष्ट्यांसकट त्याचं रंगरूप साकारणारा परग्रहवासी यंत्रमानव. त्याच्या हल्ल्यापासून पृथ्वीवासीयांचा बचाव झाला का ? फॉलसोबो कर्णानं दान केली आपली कवचकुंडलं. आज आपलं हृदय कोणी दान करील का ? मानवी हृदयाप्रमाणे काम करणारं कृत्रिम हृदय बनवता येईल का ? कार्डीओ – ७७ दहशतवादाशी लढा देणारा कृत्रिम काजवा ! पोलीसयंत्रणेला अन् लष्कराला त्याची मदत झाली का ? --https://www.amazon.ca/

Request
 

झांबल

गायकवाड, समीर

भेटलेली माणसे घनदाट होती! थेट पोचायास कोठे वाट होती? कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ह्या काव्यपंक्ती आहेत. काळजाला हात घालण्याची ताकद या ओळींत आहे. याच तोलामोलाची माणसं या कथांत भेटतील. ही माणसं अनेकार्थांनी घनदाट होती. त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत होती, मानवी जीवन मूल्यांवरचा त्यांचा विश्वास अफाट होता, त्यांची नाती अतूट मायेची होती आणि मुख्य म्हणजे अंधाराच्या उंबर्‍यावरच्या प्रकाशखुणा त्यांच्या भाळी होत्या. ही माणसं आपल्या अवतीभवतीच असतात तरीही त्यांच्यातलं वेगळेपण आपल्याला उशिराने जाणवतं. याबद्दलच्या लटक्या स्पष्टीकरणासाठी आपण पळवाटा शोधत राहतो तोवर ते निघून गेलेले असतात.--https://akshardhara.com/

Request
 

दयन

पवार, युवराज मेघराज

Request
 

या वळणावर

शिंदे, उषा

आयुष्य.. प्रत्येकासाठी वेगळं, एवढंच नव्हे, तर एकाच आयुष्यात आपण किती वेगळे आणि विरुद्ध अनुभवही घेत असतो. कधीतरी वाटतं, सारंच अधुरं... पुन्हा सुरू होतो प्रवास पूर्णत्वाच्या दिशेनं! मात्र अशा अर्धवट राहण्यात आणि त्याचा शोध घेण्यातही एक वेगळीच असोशी असते, असं वाटतं. आयुष्याच्या 'या वळणावर' या कथासंग्रहात उषा शिंद यांनी घेतलेल्या अनेकविध कथांचा हा मागोवा....--https://www.bookganga.com/

Request
 

बालूच्या अवस्थांतराची डायरी = Baluchya awasthantarachi diary : short stories

गुरव, किरण

किरण गुरव यांची कथा ही केवळ ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी'नाही.हा आजच्या काळाच्या अवस्थांतराचाच कोलाज आहे.--https://akshardhara.com/

Request
 

अंतर्नाद

जोशी, रमेश

सकारात्मकतेचे महत्व अधोरेखित करणारा ..... मानवी मनाची नकारात्मकता दर्शवणारा आणि त्याचा उताराही सांगणारा असा हा कथा संग्रह आहे---https://akshardhara.com/

Request
Auckland Council Libraries:New titles Check out the latest new titles in fiction, nonfiction, DVDs, CDs, eBooks, audiobooks, Māori, and community language books.